अंगणवाड्यातील बालकांना मिलेट बार   

पुणे जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यामधील तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित मुलांबरोबरच आदिवासी क्षेत्र आणि अनुसूचित  जातीच्या बालकांना अतिरिक्त आहार म्हणून मिलेट बार दिले जात  आहेत. अशा प्रकारचा पोषण आहार पुरवणारी पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
 
जिल्ह्यात ४ हजार ३९५ अंगणवाडी आहेत. त्यामध्ये तीव्र कमी वजन असलेली १७५ आणि मध्यम कमी वजन असलेली २ हजार ६५५ बालके कुपोषित श्रेणीमध्ये आहेत. त्याचबरोबर आदिवासी क्षेत्रातील ११ हजार २४७ आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील १४ हजार १३६ बालके आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार देण्याची योजना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आली. सरते वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट म्हणजेच तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने अंगणवाडी मधील मुलांना मिलेट बार पुरविण्याचा निर्णय घेतला.
 
यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, मिनिटभर हा अतिरिक्त पोषण आहार मुलांना ६० ते ७० दिवसांसाठी प्रत्येक दोन वेळा दिला जाईल. या पोषण आहाराची सेसिपी ही रासायनिक प्रक्रिया विना केलेली आहे. त्यामुळे ताजा सकस आणि पोषणमूल्य असलेला आहार मिळतो आहे. 
 
मिलेट बारचा पुरवठा अंगणवाडी यांना केला आहे. विद्यार्थ्यांना तो नियमितपणे मिळत आहे. पुरवठादाराचे हल्दीराम या प्रसिद्ध ब्रॅन्ड बरोबरच उत्पादनाचा करार आहे. ताजा आणि सकस आहार देता यावा, यासाठी या उत्पादकाने मिलेट बार तांत्रिक तसेच टेस्टिंग बार तांत्रिक तसेच टेस्टिंग प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यामुळे ३१ मे नंतर मुदतवाढ मागितली होती. 
अटी आणि शर्तीवर ती देण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना संपूर्ण पुरवठा झाला आहे.
 
मिलेट बारचा पुरवठा करणारी पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव असून, त्यांचे चांगले परिणाम कुपोषित बालकांवर दिसून येत आहेत.बालकांचे नियमित तपासणी करण्यात येत आहे.अतिरिक्त पोषण आहारांचा संपूर्ण कोर्स पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडीतील या वजन आणि अनुषंगिक आरोग्य विषयक बाबी तपासल्या जाणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले.
 

Related Articles